युवा लेवा मंच ची सुरवात करण्यामागील मुख्य उद्देश्य असा कि लेवा पाटीदार समाजातील सर्व युवा तरुण तरुणी यांना एकत्र आणून समाजाबद्दल आपुलकी, प्रेम आणि जागरूकता वाढीस लागावी .
बऱ्याच मित्रांच्या विनंतीवरून आपण आपल्या समाजबांधवांसाठी एक हक्काचे मुक्त Social/सामाजिक व्यासपीठ घेऊन आलो आहोत जिथं आपण मुक्तपणे चर्चा करू शकता.
लेवा पाटीदार समाजातील सर्व युवा पिढी ने आपले विचार आणि आपली मते परखड आणि निर्विवाद पणे सर्वांसमोर मांडावी हीच आमची तुमच्या कडून अपेक्षा आहे.
लेवा पाटीदार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांचे वंशज इक्षवंकू, सूर्यवंशी आहोत, याचा सर्व लेवा पाटीदार समाजाला अभिमान आणि गर्व असावा .
आपल्या समाजातील चालीरीती , आपली मायबोली भाषा अश्या अनेक गोष्टीच आपली मूळ ओळख आहे.
"आपला समाज आपली ओळख।।" सध्या च्या बदलत्या गतिमान युगामध्ये आपला समाज आपली ओळख आपण च जपणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे आणि आपण त्याचे सदयेव पालन करणे देखील अत्यंत गरजेचे आहे .
Comments
Post a Comment