जावई ।

माझा जावई शाहरूख, सलमान, रणबीरसारखाच दिसला पाहिजे.....

अशा अपेक्षा आई-वडिलांच्या आज झाल्या आहेत.  हे का होतंय, यामागे एक छोटंस कारण आहे, आपल्या मुला-मुलींशी यावर संवाद नसणे, आपल्या मुला-मुलींशी एखाद्या मित्राप्रमाणे बोला, त्यांनाही समजून घ्या, आपलंच घोडं दामटवू नका, हेकेखोरपणा बाजूला ठेवून, आधी त्यांना शांतपणे ऐकून घ्या, उगाच पॅकिंगवर, म्हणजेच दिसण्यावर जावू नका.

जावयात कर्तृत्ववान पुरूष दिसतोय का ते पाहा, कारण तो शो-पीस म्हणून कामाचा नाहीय, तर एक  कर्तृत्वावान पुरूष त्यात दिसला पाहिजे, दिसणं आयुष्यभर टिकत नाही.

कर्तृत्व पुढच्या ४ पिढ्या घडवतं, मुलाकडे काय प्रॉपर्टी आहे, नोकरी काय आहे, यापेक्षा तो किती धडपड्या आहे, त्याचे विचार काय आहेत, त्याची स्वप्न काय आहेत, त्याची क्षमता काय आहे, ते जाणून घ्या.  हे त्याच्याशी बोलणं झाल्यावरच कळू शकतं.

तुमच्या मुलीला तो किती स्वातंत्र्य देणार, किती तिचा आदर करणार, याकडे पाहा.

निश्चितच वरील मुद्यांचा विचार केला तर तुमच्या मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्न सुटलेला असेल, एका सुखी संसारकडे त्यांची वाटचाल असेल.

~~पराग बोरोले
युवा लेवा मंच।।

Comments